भूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही- पंतप्रधान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2015 04:57 PM IST

modi man ki baat

30 ऑगस्ट : नव्या प्रस्तावित भूसंपादन विधेयकावरुन शेतकर्‍यांना घाबरवण्याचं काम सुरू असल्यानं यापुढे भूसंपादन विधेयकासाठी अध्यादेश आणला जाणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान मोदींनी आज 'मन की बात' या कार्यक्रमात केली. त्याचबरोबच या विधेयकाशी संबंधित शेतकर्‍यांना फायदेशीर असणारे 13 तरतुदींची आजपासूनच अंमलबजावणी करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं. या 13 मुद्द्यांचा आधीच्या विधेयकमध्येही समवेश होता, पण त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती, असंही ते म्हणाले.

गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षण आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आटोक्यात आणण्यास सहकार्य करणार्‍या गुजरातच्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. तसंच विकास हेच आपल्या सर्व समस्यांचे समधान असल्याचही त्यांनी पुनरूच्चार केला आणि गांधी - पटेलांचा गुजरात शांततेच्या मार्गावर चालेल अशी आशाही व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पंतप्रधानांनी राखीपोर्णिमा आणि ओनमच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान विकत घेणार्‍या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदनही पंतप्रधानांनी केलं.

प्रशासकीय कचाट्यातून बाहेर पडून शेतकर्‍यांना थेट आणि योग्य मोबदला मिळावा यासाठी भूसंपादन विधेयकाचा नवा मसुदा आणला गेला होता. मात्र, विरोधकांनी याविरोधात अफवा पसरवून शेतकर्‍यांनी घाबरवण्याचं काम केलं, असे मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळे यापुढे भूसंपादन विधेयकासाठी अध्यादेश आणला जाणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी केली. त्याचबरोबर आमच्या सरकारसाठी जय जवान, जय किसान हा फक्त नारा नसून मंत्र असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading...

जनधन योजनेतंर्गत 17 कोटी 74 लाख खाते उघडण्यात आले असल्याची माहितीही मोदी यांनी दिली. तसंच या खात्यांमार्फत 22 हजार करोड रक्कम जमा करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी सांगितलं.

मोदी यावेळी म्हणाले की, जुन्या पिढीला वाटते की नव्या पिढीला काहीही समजत नाही. माझे मत वेगळे आहे. मला तरुणांकडून काहीतरी शिकायला मिळते. समाजासाठी तरुण नवनवे उपक्रम राबवितात. आदिवासींसाठी काम करणार्‍या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये राहणार्‍या महाजन बंधूंचा आजच्या मन की बातमध्ये उल्लेख करत त्यांच्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुकही केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2015 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...