पाककडून पुन्हा गोळीबार, 3 जण ठार

पाककडून पुन्हा गोळीबार, 3 जण ठार

  • Share this:

loc firing428 ऑगस्ट : पाकिस्तानाकडून नापाक हल्ले सुरूच आहे. आज पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. सीमारेषेरवर पाककडून झालेल्या गोळीबारात 3 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झाले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी रात्रीपासून जम्मू मधील अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरवर गोळीबार केलाय.

अरनिया भागात झालेल्या गोळीबारात आणखी दोन नागरिक जखमी झाल्याचं वृत आहे. जम्मूमधील आयएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफ पाच चौक्यांवर गोळीबार झालाय. एवढंच नाहीतर या भागात पाककडून शस्त्रांचा मार करण्यात आलाय. गुरुवारी रात्री 10 वाजेपासून गोळीबार सुरू आहे. पहाटे 3.30 वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. जखमी गावकर्‍यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काल गुरुवारीच भारतीय जवानांनी पाकचा आणखी एक दहशतवादी जिवंत पकडला होता. सज्जाद अहमद हा पकडलेला दहशतवादी असून तो पाकिस्तानातील मुजफ्फगड भागातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकच्या कुरापत्या सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2015 10:55 AM IST

ताज्या बातम्या