जुनी वाहनं सरकारला द्या, दीड लाखापर्यंत सूट मिळवा !

जुनी वाहनं सरकारला द्या, दीड लाखापर्यंत सूट मिळवा !

  • Share this:

car bike sale14 ऑगस्ट : 10 वर्षं जुनी असलेली वाहनं जर सरकारला दिली तर सरकार त्यावर दीड लाखापर्यंत सूट मिळणार आहे. जुनी वाहनं मोडीत काढणं आणि प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारची ही योजना असेल अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.

आपल्याकडचं जुनं वाहन विकल्यानंतर सरकार एक प्रमाणपत्र देणार आहे. त्या प्रमाणपत्रामुळं नवीन वाहन खरेदी करताना 30 हजार ते दीड लाखापर्यंतची सूट मिळणार आहे. कार आणि इतर छोट्या वाहनांसाठी 30 हजारांपासून ते ट्रक आणि इतर मोठ्या वाहनांसाठी दीड लाखांची सूट मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे दिला असल्याची माहितीही गडकरींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 14, 2015, 9:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading