पॉर्न साईटवरची बंदी उठवली

पॉर्न साईटवरची बंदी उठवली

  • Share this:

porn05 ऑगस्ट : पॉर्न साइट्सवरील बंदीमुळे टीकेचे लक्ष्य झालेल्या कें द्र सरकारने अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. केंद्र सरकारने पॉर्न साइटवरील बंदी लगेचच हटवली आहे. पण चाइल्ड पॉर्न साइट्सवरील बंदी मात्र सरकारने कायम ठेवली आहे. दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारनं पॉर्न साइटवरील बंदी हटवल्याचं स्पष्ट केलं.

पॉर्न साइटवर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्णयावर सडकून टीका झाली. त्यामुळे सरकारला आपला निर्णय अखेर मागे घ्यावा लागला. सरकारने किमान 700 पॉर्न साइटवरील बंदी हटवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण चाइल्ड पॉर्न साइट आणि ब्लू फिल्म सारख्या गोष्टीं असलेल्या किमान 100 पेक्षा अधिक साइटवरील बंदी कायम राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 5, 2015, 9:45 AM IST

ताज्या बातम्या