S M L

नागा बंडखोर आणि भारतामध्ये शांतता करार

Sachin Salve | Updated On: Aug 4, 2015 12:46 AM IST

नागा बंडखोर आणि भारतामध्ये शांतता करार

03 ऑगस्ट : भारतातल्या सगळ्यांत जुन्या समस्यांपैकी एक समस्या आज बर्‍याच अंशी सुटली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून खदखदणारं नागालँड आता शांततेत नांदण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज केंद्र सरकार आणि NSCN-IM या नागा बंडखोर संघटनेने शांतता करार केला. या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या, तेव्हा गृहमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. हा शांतता करार ऐतिहासिक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. गेल्या 16 वर्षांत चर्चेच्या 80 फेर्‍या झाल्यानंतर हा करार झाला आहे. एके काळी भारताविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे संघटनेचे नेते टी मुइवाह यांनी नागांच्या वतीने या करारावर सही केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2015 11:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close