भारतात पॉर्न साईट्सवर बंदी ?

भारतात पॉर्न साईट्सवर बंदी ?

  • Share this:

no-porn

03 ऑगस्ट : पॉर्न साईट्सवर बंदी घालणे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणारे ठरेल, असं मत काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मांडलं होतं. केंद्र सरकारने मात्र कोणालाही पत्ता न लागू देता गुपचूपपणे अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचं दिसत आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पॉर्नहब, रेडट्यूब, यासारख्या 857 पॉर्न साईट्स ब्लॉक झाल्याचे समोर आलं आहे. आयटी ऍक्ट आणि आर्टिकल 19 (2) अंतर्गत या साइट्सवर बंदी घालण्यात आली आहे. या साइट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 'सक्षम अधिकार्‍याच्या निर्देशानुसार ही साइट ब्लॉक करण्यात आली आहे', असा सदेश स्क्रीनवर झळकत आहे. टेसिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सव्हिर्स प्रोव्हायडर्सना पॉर्न साइट्सवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच टप्प्याटप्यानं आणखीही साईटसवरही बंदी घालणार असल्याचं समजतंय.

अचानकपणे अनेक पॉर्न साइट्स ब्लॉक करण्यात आल्याची बाब उघड झाल्याने त्याचे अनेक तर्क लावले जात आहेत. ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरुन यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हा घाव असल्याचा दावा नेटीझन्सनी केला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 3, 2015, 9:51 AM IST

ताज्या बातम्या