याकूबच्या फाशीविरोधात सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा

याकूबच्या फाशीविरोधात सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा

  • Share this:

Anup-Surendranath supreme court

02 ऑगस्ट :  याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अजूनही सुरूच आहे. सुप्रीम कोर्टाचे डेप्युटी रजिस्ट्रार यांनी या फाशीचा निषेध म्हणून राजीनामा दिला.सुप्रीम कोर्टाने सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून यापुढे फाशीची शिक्षाच रद्द व्हावी यासाठी अपण काम करणार असल्याचं अनुप सुरेंद्रनाथ यांनी म्हटलं आहे.

याकूब मेमनला 30 जुलैरौजी फाशी देण्यात आली असून फाशीचे पडसाद आता सुप्रीम कोर्टातही उमटले आहेत. याकूबच्या फाशीचा निर्णय अत्यंत घाईने घेण्यात आला असून न्यायप्रक्रियेच्या इतिहासातली 'ती' एक काळी रात्र असल्याचं सांगत  अनुप सुरेंद्रनाथ यांनी त्यांच्या पदावरुन राजीनामा दिला. याकूबच्या फाशीच्या निर्णायामुळे न्याय व्यवस्थेवर एक डाग लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिर्वसिटीमध्ये प्रोफेसर अनुप सुरेंद्रनाथ शिकवत होते. याकुबला फाशी देण्याच्या विरोधात करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहीमेतही त्यांचा सहभाग असल्याचं कळतंय.

Follow @ibnlokmattv

First published: August 2, 2015, 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading