गुजरातमध्ये पुराचे 20 बळी

गुजरातमध्ये पुराचे 20 बळी

  • Share this:

gujrat_flood_gujarat31 जुलै : गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं पूर स्थिती निर्माण झालीये. या पुरात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. तुर्तास पावसानं विश्रांती घेतली असली तरी, पूरामुळे मोठं नुकसान झालंय.

उत्तर गुजरातमध्ये संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यावर प्रशासनाचा भर आहे. या भागात वीजपुरवठाही खंडित झालाय. भिल्दी जोधपूर भागामध्ये रेल्वेरुळ पाण्यात गेल्यामुळे रेल्वेवाहतूक खंडीत झालीये. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताहेत. बनासकांथा जिल्ह्यात एनडीआरएफची पथकं मदतकार्यामध्ये गुंतलेली आहेत.

आतापर्यंत अनेक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तर बिठा आणि धानेरा या दोन गावांना जोडणारा रस्ता पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे अनेक वाहनं रस्त्याच्या खाली घसरली आहेत. बनासकांथा, पाटण आणि सबरकांथा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा विशेष फटका बसलाय.

Follow @ibnlokmattv

First published: July 31, 2015, 9:35 AM IST

ताज्या बातम्या