गुरूदारपूरमध्ये धुडगूस घालणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले- राजनाथ सिंह

गुरूदारपूरमध्ये धुडगूस घालणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले- राजनाथ सिंह

  • Share this:

rajnath singh 330 जुलै : पंजाबच्या गुरूदारपूरमध्ये धुडगूस घालणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (गुरूवारी) राज्यसभेत दिली. गुरूदारपूर हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत निवेदन सादर केलं. त्यात गुरूदासपूरमध्ये बेछुट गोळीबार करीत पोलीस ठाण्यात घुसून थैमान घालणारे तीन दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदीमार्गे आले होते, असं राजनाथ यांनी सांगितलं. तसंच देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणार्‍या दहशतवादी कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देईल याचाही राजनाथ यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

दरम्यान, राजनाथ सिंह राज्यसभेत निवेदन सादर करत असताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

पंजाबच्या गुरूदारपूरमध्ये सोमवारी तीन दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 6 जण मृत्युमुखी पडले होते. यामध्ये एका पोलीस अधीक्षकांसह तीन पोलीसांचा आणि तीन सामान्य नागरिकांचा समावेश आहे. 12 तासांच्या संघर्षानंतर तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.

Follow @ibnlokmattv

First published: July 30, 2015, 10:13 PM IST

ताज्या बातम्या