30 जुलै : 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलंय. याकूबच्या फाशीमुळे आता माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर दुखावले आहे. थरूर यांनी आपल्या दुखाला वाट करून देत वादग्रस्त ट्विट केलंय. आपण एका व्यक्तीला फासावर लटकवलंय. राज्य सरकारच्या या प्रायोजित फाशीमुळे आपण ही एका मारेकर्याच्या बाजूला येऊन उभे राहिलो आहोत असं ट्विट थरूर यांनी केलंय.
फाशीची शिक्षाही कोणत्याही समस्येवर कायमचा तोडगा असू शकत नाही. अशा घटना फक्त प्रतिकार आणि सरकारच्या अयोग्यतेचं दर्शन घडवते अशी टीकाही थरूर यांनी केलीय. तसंच एखाद्या व्यक्तीला फासावर लटकवून दहशतवादी हल्ला रोखला जाऊ शकत नाही असा युक्तीवादही थरूर यांनी केला. आजच 1993 बॉम्बस्फोट प्रकरण याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलंय. शशी थरूर यांचा रोख याकूबच्या फाशीकडे होता पण, थरूर यांनी याकूबचा उल्लेख न करता वादग्रस्त ट्विट केलंय.
Saddened by news that our government has hanged a human being. State-sponsored killing diminishes us all by reducing us to murderers too.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) July 30, 2015