याकूबच्या फेरयाचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

याकूबच्या फेरयाचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

  • Share this:

YakubAbdulRazakMemon_b27 जुलै : मुंबईत झालेल्या 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमन याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याकूबनं आपल्या याचिकेत त्याची फाशी रद्द करण्याची मागणी केलीय.

महाराष्ट्राच्या राज्यपालांना दयेचा अर्ज सादर केला आहे. पण त्यावर त्यांनी अजून निर्णय घेतलेला नाही. तो निर्णय येईपर्यंत फाशीला स्थगिती देण्यासाठी ही याचिका याकुबकडून करण्यात आलीय. याकुबला 1993 मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलीय. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारही याकूबच्या फाशीच्या तयारीला लागलंय. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

First published: July 27, 2015, 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading