S M L

गोव्यातील समुद्र किनार्‍यावर दिसली मगर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 17, 2015 06:16 PM IST

गोव्यातील समुद्र किनार्‍यावर दिसली मगर

17 जुलै : गोव्यातील मोरजिम इथल्या समुद्र किनार्‍यावर गुरूवारी मगर आढळल्याने खळबळ उडाली. पूर्णपणे वाढ झालेली ही मगर समुद्र किनार्‍यावर चालताना दिसत असल्याची फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. गोव्यातील वन विभागानेही या बातमीला दुजोरा दिला आहे.

crocodile 3गोव्यातील अनेक प्रसिद्ध समुद्रकिनार्‍यांपैकी मोरजिम एक आहे. राजधानी पणजीपासून 30 किलोमीटरवर असलेल्या या किनार्‍यावर अनेक पर्यटकांची वर्दळ असते. रशियन नागरिकांसाठी हा किनारा विशेष पसंतीचा आहे. नीलेश बागकर या तरुणाने या मगरीची चार छायाचित्रे फेसबुकवर अपलोड केली आहेत. यामध्ये मगर समुद्राच्या दिशेने जाताना दिसत आहे. तिच्या मागे काही कुत्रे दिसताहेत पण किनार्‍यावर इतर कसलीही वर्दळ दिसत नाही.

Crocodile 2

दरम्यान, ही मगर समुद्रातून आलेली नसून, मोरजिमजवळ चापोरा नदी समुद्राला येऊन मिळते. तिथूनच ही मगर किनार्‍यावर आली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 06:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close