कुरापत्या थांबवा नाहीतर जशास तसे उत्तर देऊ, भारताचा इशारा

कुरापत्या थांबवा नाहीतर जशास तसे उत्तर देऊ, भारताचा इशारा

  • Share this:

Pakistan Voilation

17 जुलै : भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध पुन्हा तणावग्रस्त झाले आहेत. पाकिस्तानकडून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कुरापत्या खपवून घेणार अशा शब्दात परराष्ट्र सचिव एस.जयशंकर सुनावले आहे. तसंच पाककडून कुरापत्या सुरूच राहिल्या तर भारतीय सैन्य जशास तसं उत्तर देईल, असा इशारा एस जयशंकर यांनी दिलाय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सीमेवर बीएसएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात येईल अशी माहिती CNN-IBNला मिळाली आहे.

पाकिस्तानने काल (गुरूवारी) काश्मीरमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झालाय आणि अनेक नागरिक जखमी झालेत. पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये पाडण्यात आलेले 'स्पाय ड्रोन' भारताचं असल्याचा पाकिस्तानचा दावा जयशंकर यांनी फेटाळून लावला. पाकिस्तान दावा करत असलेला ड्रोन भारतीय नाही तर चिनी बनावटीचं आहे. सीमेवर दोन्ही बाजूंकडून शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत कटीबद्ध आहे. त्यामुळे हे कृत्य भारताकडून होणं शक्यच नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

First published: July 17, 2015, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading