15 जुलै : देशाचा सुरक्षेचा पाया आता अधिक भक्कम होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी 300 अब्ज रुपयांची संरक्षण सामुग्री खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलीये. संरक्षण उपकरणं आणि एकंदर सामुग्रीचं आधुनिकीकरणाचा हा एक भाग आहे.
या खरेदीमध्ये बोईंग या कंपनीकडून 4 हेरगिरी करणारी विमानं, आणि विमानविरोधी तोफांचा समावेश आहे. या तोफांचीच किंमत 169 अब्ज रुपये एवढी आहे. 'मेक इन इंडिया' मोहिमेखाली या तोफा भारतातच बनणार आहेत.
या खरेदीत अमेरिकेचा वाटा मोठा आहे. मोदी सरकार आल्यावर अमेरिकेशी संरक्षणविषयी संबंध दृढ करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींना आळा घालण्यासाठी या हेरगिरी विमानांचा मोठा उपयोग होणार आहे.
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा