केरळच्या किनार्‍यावर आढळली संशयास्पद बोट

केरळच्या किनार्‍यावर आढळली संशयास्पद बोट

  • Share this:

ËÖêêß×ÖêÖîßîÖÖêßÖîÖêpy

05 जुलै : केरळच्या किनार्‍याजवळ 'बारूकी' नावाची संशयास्पद इराणी मच्छिमार बोट तटरक्षक दलानं ताब्यात घेतली आहे. या बोटीवरून 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच बोटवर सॅटेलाइट फोन आणि एका खलाशाकडे पाकिस्तानी ओळखपत्र आढळल्याने कोणत्या उद्देशाने या बोटने भारतीय सागरी क्षेत्रात प्रवेश केला, याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

तटरक्षक दलाला अलापुझाजवळ भारतीय हद्दीत संशयास्पद बोट दिसल्याने तातडीने या बोटीवर कारवाई करण्यात आली. या बोटला चारही बाजूने घेरून बोटवरील सर्व खलाशांना ताब्यात घेण्यात आले. तटरक्षक दलाने संपूर्ण बोटची झडती घेतली असून अटक करण्यात आलेल्या बाराही जणांना केरळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 25 मे रोजी या बोटीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर इंजिन बिघडल्यानं ही बोट भरकटली असं या कर्मचार्‍यांचं म्हणणं आहे. पण पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. याबाबतचा संपूर्ण तपशील देऊन तपास 'एनआयए'कडे देण्यात येईल, असं केरळच्या पोलिसांनी सांगितलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 5, 2015, 8:59 PM IST

ताज्या बातम्या