सरकारने केली आर्थिक स्थिती आणि जातीनिहाय जनगणना

सरकारने केली आर्थिक स्थिती आणि जातीनिहाय जनगणना

  • Share this:

janganana03 जुलै : केंद्र सरकार पहिल्यांदाच देशात सामाजिक आर्थिक स्थिती आणि जातीनिहाय जनगणना केली आहे आणि त्यातून मिळालेली माहिती आज सरकारनं प्रसिद्ध केली. नवी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती उघड केली.

देशातल्या गरिबीचं नेमकं कारण शोधण्यासाठी याचा उपयोग होईल, असा विश्वास जेटलींनी यावेळी व्यक्त केला. गरिबीचं उच्चाटन आणि आर्थिक मागासांचा विकास करणं सोपं जाईल, असं ते म्हणाले. 1932 नंतरचा अशा प्रकारची ही पहिलीच जनगणना आहे. यात विशिष्ट प्रदेश, समुदाय, जात, आणि आर्थिक बाबींचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना आपली धोरणं ठरवण्यासाठी या जनगणनेचा मोठा फायदा होईल, असा दावा जेटली यांनी केला.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2015 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...