विमानाच्या खोळंब्यावरून मुख्यमंत्री फडणवीस अडचणीत

विमानाच्या खोळंब्यावरून मुख्यमंत्री फडणवीस अडचणीत

  • Share this:

airindia-fadnavis_6

02 जुलै : मंत्र्याच्या व्हीआयपी दौर्‍यासाठी सामान्य प्रवाशांना वेठीस धरून विमानाचे उड्डाण लांबवल्या प्रकरणी आज पंतप्रधान कार्यालयाने हवाई मंत्रालयाकडे अहवाल मागितला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 29 जूनला अमेरिकेच्या दौर्‍यासाठी रवाना झाले. त्यावेळी विमानतळावर त्यांचे प्रधान सचिव प्रवीणकुमार परदेशी व्हिसा घरीच विसरल्यामुळे विमानला उड्डाण भरण्यास तब्बल सव्वा तास उशीर झाला. प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यामुळे अखेर पंतप्रधान कार्यालयाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. पीएमओने या संदर्भात माहिती अहवाल मागितला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मात्र या संदर्भात चुकीचे आरोप होत असल्याचं म्हटलं आहे. मी वेळेतच विमानात बसलो होतो. खोटी माहिती पसरविणार्‍यांवर महाराष्ट्रात परतल्यावर बदनामीचा खटला दाखल करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून दिला.

Follow @ibnlokmattv

First published: July 2, 2015, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading