Elec-widget

ललित मोदींची 'बॅटिंग' सुरूच ; जेटली, शुक्लांच्या चौकशीची हिंमत आहे का ?

ललित मोदींची 'बॅटिंग' सुरूच ; जेटली, शुक्लांच्या चौकशीची हिंमत आहे का ?

  • Share this:

lalit modi 4301 जुलै : ललित मोदी यांचा लंडनमध्ये बसून आरोपांचा सिलसिला सुरूच आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, वसुंधराराजे यांच्यानंतर आता यावेळी निशाण्यावर आहेत ते अर्थमंत्री अरुण जेटली, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला.

फेमा कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालय ललित यांच्यावर कारवाई करतंय. मग, ही कारवाई जेटली आणि श्रीनिवासन यांच्यावर का नाही? मलाच का यात अडकवलं जातंय? असे सवाल ललित मोदींनी विचारले आहे.

मी जेव्हा आयपीऐलचा कमिशनर होतो, तेव्हा बीसीसीआयच्या जनरल कमिटीमध्ये वरील लोक होते. मग, मलाच अर्थिक गुन्हेगार म्हणून का रंगवलं जातंय. बाकीच्या आठ आर्थिक गुन्हेगारांचं काय, असंही मोदी म्हणाले.

आता यावर जेटली आणि श्रीनिवासन काय म्हणतात, हे पहावं लागेल. ललित मोदींनी या अगोदर सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दलही खुलासा केल्यामुळे विरोधकांनी भाजपला धारेवर धरलं होतं. आता अरूण जेटली यांच्याबद्दल खुलासा केल्यामुळे भाजपची आणखी डोकेदुखी वाढणार आहे.

ललित मोदींनी नेमकं काय म्हटलंय ?

Loading...

 "माझा ईडीला प्रश्न आहे - अरुण जेटली आणि राजीव शुक्लांना चौकशीसाठी बोलवण्याची हिंमत तुमच्यात आहे का? आठ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. पण, फक्त एकाला आर्थिक गुन्हेगार म्हणून दाखवलं जातंय. फक्त माझा पासपोर्ट रद्द केला होता. फक्त मीच का?"

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2015 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...