30 जून : महागाईचा तडका सहन करणार्या सामान्य माणसांना दिलासा देणारी बातमी आहे. आज मध्यरात्री पासून पेट्रोलचे दर प्रति लीटर 31 पैसे तर डिझेल प्रति लीटर 71 पैशांनी स्वस्त होणार आहेत.
पंधराच दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दरात 64 पैशांनी वाढ झाली होती. पण आता पुन्हा दर 31 पैशांनी घटल्यामुळे कारमालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. डिझेलचे दर 15 दिवसांपूर्वी 1 रुपया 35 पैशांनी कमी झाले होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्यामुळे वाहनचालकांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
Follow @ibnlokmattv |