बँकांमध्ये 7 हजार कोटींचा घोटाळा, CBIचे महाराष्ट्रासह देशभरात छापे

बँकांमध्ये 7 हजार कोटींचा घोटाळा, CBIचे महाराष्ट्रासह देशभरात छापे

CBIच्या या छाप्यांमध्ये अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

मुंबई 5 नोव्हेंबर : PMC बँकेचा घोटाळा ताजा असताना CBIने महाराष्ट्रासह देशभरात छापे टाकून मोठी कारवाई केलीय. देशभरातल्या विविध बँकांमध्ये तब्बल 7 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा हा घोटाळा असून त्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. बँक घोटाळ्यांच्या 35 प्रकरणी CBIकडे गुन्हा नोंदवला गेलाय. त्याच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली असून विविध राज्यांमध्ये 169 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या CBIने आक्षेपार्ह कागदपत्र, महत्त्वांच्या फाईल्स, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर कागदपत्र जप्त केली आहेत. बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईक आणि संबंधीत लोकांना भरमसाठ कर्ज वाटायची आणि ती नंतर भरायचीच नाही असा उद्योग अनेक ठिकाणी सुरू होता.

या घोटाळात सामान्य ठेविदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनेही निर्बंध आणल्याने अनेक बँकांमध्ये लोकांना पैसे काढणही अवघड झालंय. अशा घटना घडत राहिल्याच लोकांचा बँकिंग सिस्टिमवरचा विश्वासच उडण्याची भिती व्यक्त केली जातेय. त्यामुळे सर्वच बँकांनी आपल्या व्यवहारात सुधारणा करत पारदर्शकता आणावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

राज्यातला सत्तेचा पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार

PMC बँक घोटाळ्यात 8 व्या खातेदाराचा मृत्यू

महाराष्ट्रात झालेल्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी 8व्या खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एंड्रयू लोबो नावाच्या एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एंड्रयू यांच्यावर उपचार सुरू होते. पण पैसे न मिळण्याच्या भीतीमुळे ते तणावात होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या मंगळवारी कुलदीप कौर विज (64) यांचे नवी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यापूर्वी फट्टोमल पंजाबी, संजय गुलाटी, मुरलीधर धरा यांच्यासह भारती सदरंगानी नावाच्या वृद्ध महिलेचादेखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 खातेदारांचा मृत्यू झाला आहे.

देवेंद्र फडणवीस 'मावळते मुख्यमंत्री', शिवसेनेने भाजपवर सोडला टीकेचा 'बाण'

पीएमसी खात्यातून काढू शकतात 1 लाख रुपये

अलीकडेच आरबीआयने बँकेच्या ग्राहकांसाठी रोख रक्कम काढण्याची कमाल मर्यादा 25,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढविली आहे. आता काही विशेष प्रकरणांमध्ये आरबीआयने 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची तरतूद केली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 1 लाखांपर्यंत पैसे काढणे शक्य आहे. त्याचबरोबर विवाह, ज्येष्ठ नागरिक, शिक्षण आणि अपंग लोकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपये केली आहे.

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्यात गेल्या काही दिवसांआधी धक्कादायक माहिती समोर आली होती. बँकेच्या नोंदीत 10.5 कोटींची नोंद नसल्याचं तपास पथकानं म्हटलं. एचडीआयएल आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी दिलेले धनादेश पथकाच्या हाती लागले. विशेष म्हणजे हे धनादेश कधीच बँकेत जमा न करता रोख रक्कम देण्यात आली. त्याशिवाय हा घोटाळा 4 हजार 355 कोटी रुपयांचा नसून तब्बल 6 हजार 500 कोटींचा असल्याचंही समोर आलं.

'शिवसेना पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जातंय', संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या पथकाला मिळालेल्या धनादेशांची एकूण किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अंदाजे 50 लाख रुपयांचा हिशोब नाही. याशिवाय बँकेतील घोटाळ्याची रक्कम 2 हजार कोटींनी वाढली आहे. आता ती 6 हजार 500 कोटी रुपये इतकी झाली.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 5, 2019, 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading