पाकची आदळआपट सुरूच, पाक सैनिकांचा सीमेवर गोळीबार

पाकची आदळआपट सुरूच, पाक सैनिकांचा सीमेवर गोळीबार

  • Share this:

ceasefire

12 जून : भारतीय जवानांनी मिशन म्यानमार फत्ते केल्यामुळे पाकिस्तान चांगलंच बिथरलंय. एकीकडे पाकचे नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे तर दुसरीकडे भारतीय सीमेवर पाकिस्तान सैनिकांकडून गोळीबार केला जातोय. शस्त्रसंधीचा भंग करत पुँछ सीमेनजीक पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीमध्ये गोळीबार केल्याचे वृत्त आहे. रात्री 12 ते सव्वाबाराच्या सुमाराला पाकनं 3 बीएफएस कँम्प्सला लक्ष्य केलं. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भारतीय लष्कराच्या जवानांनी म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या केलेल्या खात्म्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे पाकचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कालच भारतानं पाकिस्तानला म्यानमार समजू नये, असा इशारा पाकिस्ताननं दिला. पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान आणि लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पाकिस्तान हे काही म्यानमार नव्हे. सीमेपलीकडून आलेल्या कुठल्याही धमकीला घाबरणार नाही. पाकिस्तानविरोधात कुणाचे काही मनसुबे असतील तर ते उधळून लावू,असं या दोघांनी सांगितलं.

तसंच, भारतीय राजकारणी संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन तर करत आहेतच शिवाय दुसर्‍या राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यातही त्यांना अभिमान वाटतोय, हे खेदजनक आहे. पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत कुणी करू नये असंही पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरिफ यांनी म्हटलंय. भारताच्या कारवाईमुळे  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, तसंच तिथले संरक्षण मंत्री, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या ISI आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. पण, याचे पडसाद सीमेवरही उमटले. पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर गोळीबार करून आदळआपट केलीये.

Follow @ibnlokmattv

First published: June 12, 2015, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading