S M L

देशातली पहिली लेसबियन जाहिरात व्हायरल

Sachin Salve | Updated On: Jun 12, 2015 03:11 AM IST

देशातली पहिली लेसबियन जाहिरात व्हायरल

11 जून : युट्युबवर सध्या एक जाहिरात नेटिझन्सच्या पसंतीला उतरतेय. यात 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असणारं एक लेसबियन कपल

दाखवलंय. या मुली एकमेकींच्या पालकांना भेटायला तयार होत आहेत. 'द व्हिजिट'असं नाव असलेल्या या जाहिरातीच्या रूपाने भारतात पहिल्यांदाच 'समलिंगी जोडपं' हा विषय जाहिरातीच्या माध्यमात हाताळला गेला आहे. ऑनलाईन फॅशन रिटेलर 'मिंट्रा' ने ही जाहिरात बनवलीये. त्यांचं 'एथनिक वेअर कलेक्शन' ला प्रमोट करण्यासाठी ही जाहिरात बनवण्यात आली आहे. 'ओ अँड एम' या ऍड एजन्सीने बनवलेल्या या जाहिरातीला इंटरनेटवर 30 लाखांहुन अधिक हिट्स मिळाल्या आहेत.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 11:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close