S M L

म्यानमारमधली कारवाई सैन्याचं मनोबल वाढवणारी - मनोहर पर्रिकर

Samruddha Bhambure | Updated On: Jun 11, 2015 01:42 PM IST

Defence minister parrikar

11 जून : म्यानमारमध्ये घुसून दहशतवादविरोधातील कारवाईने भारतीय सैन्याचं मनोबल वाढलं असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रतिमेतही बदल झाला आहे, असं मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय जवानांनी म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना पर्रिकर बोलत होते.

यापुढे दहशतवादविरोधी कारवाईसाठी आम्ही कोणावरही अवलंबून राहणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. म्यानमारमधील कारावाईनंतर सुरक्षेबाबत भारतीय नागरिकांच्या विचारधारेतही बदल झाल्याचं जाणवत आहे. विचार बदल्यानंतर आता अनेक बाबींमध्ये बदल झाल्याचं पहायला मिळणार असल्याचा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 01:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close