09 जून : चेन्नईजवळच्या किनार्यावर भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान काल रात्रीपासून बेपत्ता झालं आहे. विमानात तीन क्रू मेंबर असून, त्यांच्या शोध घेण्यात येत आहे.
चेन्नई विमानतळावरून सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता या विमानाने उड्डाण घेतलं होतं. रात्री दहाच्या सुमारास विमानातील वैमानिकांशी शेवटचा संपर्क करण्यात आला होता. तेव्हापासून विमान रडारवरून बेपत्ता आहे. भारतीय नौैदल आणि तटरक्षक दल यांची विशेष टीम विमानाचा शोध घेतं आहे.
Follow @ibnlokmattv |