07 जून : बिहारमध्ये येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
निवडणुकीत भाजपविरोधात सगळे पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्यामुळे आता नितीश कुमार हे आपल्या आघडीत काँग्रेसलाही देखील समावून घेण्याची चिन्हे दिसत असून, याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या भेटीसाठी आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे, लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची आघाडी अजुनही अंधातरी आहे. लालूप्रसाद यांचा नितीश यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करायला विरोध आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्यामागे ताकद उभी करावी यासाठी नितीश यांनी राहुल गांधी यांची मनधरणी केल्याचं समजतं.
Follow @ibnlokmattv |