मॅगीवर आणखी तीन राज्यात बंदी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2015 08:44 PM IST

मॅगीवर आणखी तीन राज्यात बंदी

BRKING940_201506041617_940x355

04 जून : मॅगीसमोरील अडचणीत दिवसेंदिवस भर पडते आहे. दिल्ली पाठोपाठ देशातील अनेक राज्यांनी मॅगीवर बंदी घातली आहे. आज गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू आणि जम्मू-कश्मीर या राज्यांनी मॅगवीर बंदी घातली. तर महाराष्ट्रात मॅगीच्या नमुन्यांचा अहवाल उद्या येणार आहे. त्यानंतर बंदीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये मॅगीवर एका महिन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तर उत्तराखंड सरकारने मॅगीचे सँपल्स कोलकत्याला तपासणीसाठी पाठवले असून, मॅगीवर तात्काळ बंदी घातली आहे.  बंदीत्यामुळे मॅगी आणि ते तयार करणारी नेस्टले कंपनीच्या अडचणी वाढत झाली आहे.

मॅगी नूडल्सच्या सुरक्षेच्या दर्जावरून जो वाद सुरू आहे, त्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्व राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांची अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता संघटनेसोबत नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

दिल्ली सरकारनेही बुधवारीच मॅगीच्या विक्रीवर 15 दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तेथे घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्याने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तर जम्मू-काश्मीर सरकारनं तर सर्व चाचण्या पूर्ण होईपर्यंत मॅगी खाऊ नये, असं आवाहन सरकारने लोकांना केलं. तर केरळ सरकारनं मॅगीसोबतच इतर ब्रँडच्या नूडल्सचेही नमुने तपासणीसाठी घ्यायला सुरुवात केली आहे. देशभरातल्या मॅगीच्या सर्व सात प्रकारांची चाचणी केली जाणार आहे.

Loading...

दुसरीकडे मॅगीचे ब्रँड ऍम्बॅसेडर अमिताभ बच्चन यांच्याविरोधात राजस्थानमध्ये तक्रार दाखल करण्यातआली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2015 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...