04 जून : मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलाय. या हल्ल्यात एका जेसीओसह 20 जवान शहीद झाले आहेत, तर 11 जवान जखमी झाले आहेत.
चंदेल जिल्ह्यातील तेन्गोपलच्या जवळ असलेल्या जंगलामध्ये हा हल्ला झाला.चंदेल जिल्ह्यातील तेन्गोपलच्या जवळ असलेल्या जंगलामध्ये हा हल्ला झाला. अतिरेक्यांनी आज (गुरुवारी) सकाळी साडे आठच्या सुमारास दक्षिण इंफाळच्या सेक्टर 26मधील 6 डोगरा रजिमेंटच्या तुकडीवर हल्ला केला.
सुरुवातीला अतिरेक्यांनी आयडी स्फोट केला आणि त्यानंतर लष्करी ताफ्यावर रॉकेट लाँचर आणि ऑटोमॅटीक वेपन फायरच्या सहाय्यानं हा भ्याड हल्ला केला. या ताफ्यात एकूण 4 वाहनं होती. जखमी जवानांना दिमापूरला हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
(सविस्तर बातमी लवकरच)
Follow @ibnlokmattv |