दिल्लीतही मॅगीची 'टेस्ट' बिघडलेलीच !; केरळ हरियाणामध्ये बंदी

दिल्लीतही मॅगीची 'टेस्ट' बिघडलेलीच !; केरळ हरियाणामध्ये बंदी

  • Share this:

maggi ban02 जून : 2 मिनिटांत चटकदार मॅगी आता तुमच्या आरोग्यासाठी घातक असल्याचा अहवाल आता समोर आलाय. राजधानी दिल्लीत मॅगीची चाचणी घेण्यात आलीय. या चाचणीत मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण जास्त आढळले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने मॅगीला रेड सिग्नल दिलाय. त्यापाठोपाठ केरळ आणि हरियाणामध्येही मॅगीवर बंदी घालण्यात आलीये. सर्व सरकारी दुकानांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आलीये. आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने मॅगीचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवले आहे. एवढंच नाहीतर मॅगी खाण्यासाठी जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

2 मिनिटस् असं म्हणत तयार होणारी मॅगी आता मोठ्या संकटात सापडलीय. मॅगी या नुडल्समध्ये एमएसजी आणि शिसे प्रमाणापेक्षा जास्त असल्यानं संपुर्ण भारतात मॅगीच्या नमुन्यांची चाचणी केली जाते आहे. दिल्लीत मॅगीच्या 13 सॅम्पलची चाचणी घेण्यात आलीय. 13 पॅकी सॅम्पलमध्ये शिशाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले आहे.

मॅगीमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसं प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं उत्तर प्रदेशच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाला आढळलंय. त्यामुळेच आता देशभरात मॅगीचे नमुने तपासले जाणार आहेत. तपासणी अहवालात मॅगीमध्ये आरोग्याला हानीकारक पदार्थ असल्याचं स्पष्ट झालं तर ग्राहक तक्रार निवारण आयोगात नेस्ले कंपनीविरुद्ध खटला दाखल केला जाऊ शकतो

केवळ नेस्ले कंपनी अडचणीत येणार नाहीए तर मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा हे सेलिब्रिटीही अडचणीत येणार आहेत. या प्रकरणात अभिनेत्री माधुरी दिक्षीतला नोटीसही बजावण्यात आली आहे. आज बिहारमध्ये अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित विरोधात गुन्हेही दाखल झाले आहे.

उत्तरप्रदेशातल्या एका स्थानिक न्यायालयात नेस्ले विरुद्ध या अगोदरच एक खटला सुरू आहे. आता तर काही सामाजिक संघटनांनीसुद्धा मॅगीविरोधात आवाज उठवलाय. त्यामुळे आता अनेकांना प्रिय असलेल्या मॅगीला नवा पर्याय शोधावा लागण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2015 08:28 PM IST

ताज्या बातम्या