ढग दाटून आले..,मान्सून आला वेशीवर !

ढग दाटून आले..,मान्सून आला वेशीवर !

  • Share this:

mansoon in keral3430 मे : उन्हाचा तडाख्याने जीवाची काहीली झालीये..घामाच्या धारांची घामघूम झालेल्यांना आता लवकरच गारेगार दिलासा मिळणार आहे. कारण, मान्सून आता भारताच्या वेशीवर येऊन ठेपला असून केरळमध्ये कधीही धडकण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवसांत तो महाराष्ट्राकडे कूच करेल आणि कोकणात हजेरी लावले. यंदा देशभरात उष्णतेची लाट पसरली. या लाटेत आतापर्यंत 2 हजार लोकांचा बळी गेल्याय. त्यामुळे मान्सूनची चातकासारखी वाट पाहण्याची प्रतिक्षा आता संपणार असून लवकरच चिंब भिजण्याची संधी मिळणार आहे.

मात्र, मान्सून दाखल झाला तरी तो बेभरवशाच असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. यंदा 93 टक्के मान्सून येईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या मान्सूनचा अंदाज जाहीर केला. जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्यापेक्षा पाऊस कमी राहील असाही अंदाज वर्तवण्यात येतोय. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यताही आहे.

उष्माघातामुळे 2 हजार बळी

देशभरात उष्माघातामुळे 2 हजार लोकांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. दोन्ही राज्यांमधलं तापमान 47 अंशांवर आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताने जवळपास 1700 लोकांचा मृत्यू झालाय. तर ओडिशामध्ये 89 आणि गुजरामध्येही 7 जणांचा उष्माघातानं बळी गेलाय.  ओडिशामधल्या कलांगडी जिल्ह्यात राज्यातल्‌या सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झालीय.

बारामतीत शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस

बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारी रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे काही वेळातच शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कडकडाटासह पाऊस पडला नव्हता. रात्री झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र एज्युकेश सोसायटीचे विद्यालय, विद्या प्रतिष्ठानच्या शाळेचे मैदाने, रेल्वे स्टेशन समोरील मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. शहरातील जैन मंदिराच्या तळ मजल्यावर पाणी साचंल आहे. शहरात जागोजागी पाण्याची तळी निर्माण झाली आहे. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणंची झाडे उन्मळून पडली आहेत. तरी काही झाडं अर्धवट पडली आहेत.शहरातील वीज पुरवठाही खंडित झाला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2015 01:44 PM IST

ताज्या बातम्या