S M L

मोदींवर टीकेमुळे IIT मद्रासमध्ये दलित विद्यार्थी संघटनेवर बंदी

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 01:59 PM IST

मोदींवर टीकेमुळे IIT मद्रासमध्ये दलित विद्यार्थी संघटनेवर बंदी

29 मे : आय आय टी मद्रासच्या कॅम्पसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार्‍या एका दलित संघटनेवर बंदी घालण्यात आलीये. एका विद्यार्थी समुहाकडून तक्रार मिळाल्यामुळे संस्थेनं ही बंदी घातलीये.

मोदी सरकारच्या कामगिरीविषयी आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलतर्फे चर्चासत्र होणार होतं. पण मनुष्यबळ विभागानं पाठवलेल्या निर्देशांनंतर त्यावर बंदी घालण्यात आलीये. मोदी सरकराच्या योजना अनुसूचित जातीजमातींच्या विरोधात असल्याचा दावा स्टडी सर्कलकडून केला जात असल्याची तक्रार करण्यात आलीये.

गोवंश बंदीलाही या विद्यार्थी समूहाचा विरोध असल्याची आणि मोदींविरोधातले विचार हा स्टडी ग्रुप पसरवत असल्याची मनुष्यबळ मंत्रालयाकडे तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर  मंत्रालयाचे निर्देश देण्यात आलेत.


पण, कुणीतरी तक्रार केली म्हणून आमच्या गटावर बंदी घातली हे चुकीचं आहे. आम्हाला बोलण्याची संधी न देता बंदी घालून तरूणांचा आवाज दाबला जात आहे अशी प्रतिक्रिया आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलच्या विद्यार्थांनी दिली.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 01:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close