S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'पंतप्रधानपद स्वतःच्या फायद्यासाठी कधीही वापरलं नाही'

Sachin Salve | Updated On: May 27, 2015 05:07 PM IST

'पंतप्रधानपद स्वतःच्या फायद्यासाठी कधीही वापरलं नाही'

27 मे : मी जेव्हा पंतप्रधान होतो, तेव्हा मी माझ्या पदाचा वापर स्वतःच्या किंवा परिवाराच्या फायद्यासाठी कधीही केली नाही, असं स्पष्टीकरण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलंय. मनमोहन सिंग दिल्लीतील एनएसयूआईच्या राष्ट्रीय संमेलनात बोलत होते.

काल मंगळवारी टेलिकॉम मंत्रालयात मोठ्या घोटाळ्यासाठी जी धोरणं राबवली गेली, त्याच्या आड येऊ नका, असं आपल्याला मनमोहन यांनी सांगितलं होतं, असा दावा ट्रायचे माजी अध्यक्ष प्रदीप बैजाल यांनी केला होता. त्याला आज मनमोहन सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं.

यूपीए सरकारवर करण्यात आलेल आरोप चुकीचे होते. आम्ही जेव्हा सत्ता सोडली तेव्हा भारत अर्थव्यवस्थेत प्रगती करणार दुसरा देश होता. पण, आता भाजपने भ्रष्टाचाराचा मुद्दा उकरून काढून लोकांची दिशाभूल करत आहे अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2015 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close