S M L

मोदी सरकारची आज वर्षपूर्ती, शेतकर्‍यांना 'किसान चॅनल' भेट !

Sachin Salve | Updated On: May 26, 2015 01:48 PM IST

मोदी सरकारची आज वर्षपूर्ती, शेतकर्‍यांना 'किसान चॅनल' भेट !

26 मे : यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत मोदी लाटेवर भाजप सरकार सत्तेवर विराजमान झालं. नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आयेंगे असं आश्वासनं देत भाजपच्या नेतृत्वाची धुरा हाती सांभाळली. आज (मंगळवारी) मोदी सरकारला आज एक वर्ष पूर्ण होतंय.

वर्षपूर्ती निमिताने मोदी सरकारने कार्यक्रमांचा धडाका लावलाय.

याचनिमित्ताने आयोजित केलेल्या जन कल्याण पर्व साजरं होतंय. यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज रेल्वेतर्फे प्रवासी सुविधा मोहीम राबवली जाणार आहे. पंतप्रधान मोदी आज शेतकर्‍यांसाठी पहिल्या 24 तास चॅनलचं उद्घाटन करणार आहेत. या चॅनलचं नाव 'डीडी किसान' असं असेल. याशिवाय सकाळी 11 वाजता भाजपचे अध्यक्ष अमित शहा पत्रकार परिषद घेणार आहेत. ते हरियाणात सभाही घेणार आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची पाटण्याची सभा 2 वाजता सुरू होईल. तर राजनाथ सिंग यांची कोलकात्यातली सभा 3 वाजता सुरु होईल.तर मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई भाजपही कार्यक्रम आयोजित करणार आहे. 4 वाजता भाजपच्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात वर्षपूर्ती साजरी करण्यात येईल. तर 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दादरमध्ये पत्रकार परिषद घेतील. तर पुण्यात भाजपची रॅली आयोजित करण्यात आली आहे.

'बुरे दिन गेले की नाही'

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथं जन कल्याण सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी एका वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी मागच्या यूपीए सरकारवरही जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला अच्छे दिनाची घोषणा देणार्‍या मोदी यांनी आज भाषणादरम्यान 'बुरे दिन गेले की नाही' असा प्रश्न जोरकसपणे विचारला. तसंच आता घोटाळेबहाद्दरांसाठी बुरे दिन आल्याचा इशारा दिला. तसंच आपण देशाचे प्रधानमंत्री म्हणून काम करत नसून प्रधानसंत्री, प्रधान सेवक आणि प्रधान ट्रस्टी म्हणून काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भूसंपादन विधेयकामुळे मोदी सरकारवर देशभरातून टीका होतेय. त्या पार्श्वभूमीवर आपलं सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करत असल्याचं पंतप्रधानांनी ठासून सांगितलं.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2015 09:34 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close