मोदींच्या 'त्या' वक्तव्यावरून पेटला वाद, #ModiInsultsIndia ट्रेंडिंग

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 19, 2015 07:45 PM IST

मोदींच्या 'त्या' वक्तव्यावरून पेटला वाद, #ModiInsultsIndia ट्रेंडिंग

Narendra modi teremding

19 मे : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी चीनच्या दौर्‍यावर भारतीयांबद्दल केलेले विधान त्यांना चांगलेच महागात पडले आहे. मोदींवर टीका करत आज सकाळपासून #ModiInsultsIndia हा हॅशटॅग ट्रेंड जबदस्त हिट ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर हीरो असलेले मोदी आता व्हिलन ठरलेत.

वर्षभरापूर्वी म्हणजेच आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी आपण भारतीय असल्याचे सांगण्याची परदेशातल्या भारतीयांना लाज वाटत होती. पण, आता ही परिस्थिती बदलली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन इथल्या शांघायमध्ये भारतीय समुदायासमोर बोलताना केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर नाराज झालेल्या भारतीय नेटीझन्सनी मोदींवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. मोदींची भाषणं चांगली असली तरी त्यांनी विदेशात असं बोलणं टाळलं पाहिजे, असं नेटीझन्सचं म्हणणं आहे. तर काँग्रेसनही पंतप्रधानांच्या भाषणावर जोरदार आक्षेप घेतला आहे. मोदी सातत्यानं विदेशात आघाडी सरकारच्या कारभारावर नाव न घेता टीका करत असल्यानं काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केला आहे.

ट्विटरवरून मोदींना कसं टार्गेट केलं जातंय, त्याबाबतचे काही ट्विट्स...

Loading...

.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2015 07:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...