दिल्लीमध्ये केजरीवाल आणि नायब राज्यपालात 'जंग'

दिल्लीमध्ये केजरीवाल आणि नायब राज्यपालात 'जंग'

  • Share this:

kejrival vs jang19 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातला संघर्ष दिवसागणिक वाढतोच आहे. दिल्लीच्या मुख्य सचिव शकुंतला गॅमलीन यांच्या नियुक्तीवरून हा सगळा वाद सुरू आहे.

गॅमलिन यांची नियुक्ती जंग यांनी केली होती, आणि केजरीवाल यांना हे पटलेलं नाही. आता दिल्ली सरकार कायदेशीर सल्ला घेतंय. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी दिल्ली सरकारला असा सल्ला दिलाय, की प्रशासनाला आपले अधिकारी निवडण्याचा अधिकार आहे. नायब राज्यपालांना नियुक्तांबद्दल जाणून घ्यायचा अधिकार आहे, पण स्वतः नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही, असं ज्येष्ठ सुप्रीम कोर्ट वकील राजीव धवन यांनी म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2015 03:56 PM IST

ताज्या बातम्या