अधिवेशनाचं सूप वाजलं, काळ्या पैशाचं बिल पास झालं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 13, 2015 11:36 PM IST

black money13 मे : 3 महिने चाललेलं मोदी सरकारचं पहिलं पूर्ण बजेट अधिवेशन आज (बुधवारी) पार पडलं. शेवटच्या दिवशी राज्यसभेत काळ्या पैशासाठीच्या शिक्षेसाठीचं बिल पास झाल्यामुळे जाता जाता सरकारला दिलासा मिळाला. पण भूसंपादन विधेयक टोकाच्या विरोधामुळे संयुक्त समितीकडे पाठवावं लागणं सरकारला झटका ठरला. शिवाय GST सारखंही महत्त्वाचं विधेयक रोखण्यात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना यश आलं.

जमीन संपादनाच्या मुद्यावरून विरोधकांची झालेली एकी सरकारला भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे. पण सरकारच्या पदरातही काही गोष्टी जमा झाल्यात. खाण, विमा अशा महत्त्वाच्या विधेयकांना मंजूर करून घेण्यात सरकार यशस्वी ठरलं. शिवाय बांगलादेश सोबतचा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक सीमा करार देशाने एकमताने मंजूर केल्यामुळे विरोधकांच्या सोबत चर्चा करुन सहमती मिळवण्याचा सुषमा स्वराज पॅटर्न चर्चेचा विषय ठरला. एकंदरीतच सरासरीपेक्षा जास्त काम करणार्‍या अधिवेशनाचं आज सूप वाजलं.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2015 11:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...