जाहिरातींमध्ये फक्त राष्ट्रपती, पंतप्रधानांचे फोटो वापरा- सुप्रीम कोर्ट

जाहिरातींमध्ये फक्त राष्ट्रपती, पंतप्रधानांचे फोटो वापरा- सुप्रीम कोर्ट

  • Share this:

Supreme court of india

13 मे : सरकारी जाहिराती आणि होर्डिंगबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकारी जाहिरातींमध्ये महात्मा गांधी, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचेच फोटो लावता येतील असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे सरकारी जाहिरातींमधून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करणार्‍या नेत्यांना आणि राजकीय पक्षांना चाप बसणार आहे.

सरकारी जाहिरातीसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. सरकारी जाहिरातींमध्ये कोणत्याही राज्याचे मंत्री, राजकीय पक्षाचा नेता, अधिकारी यांचे फोटो छापता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसंच सरकारी जाहिरातींच्या स्पेशल ऑडिटची गरज नाही, असंसुद्धा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. सरकारला जनतेच्या पैशांनी दिलेल्या सरकारी जाहिरातीतून राजकीय लाभ घेऊ देणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. जाहिरातींमध्ये जनतेचा पैसा वाया जाऊ नये यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे आदेशही कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.

सरकारी जाहिरातींना चाप

- राजकीय हेतूने प्रेरीत असलेल्या राज्य आणि केंद सरकारच्या जाहिरातीवर बंदी

- यापुढे जाहिरातीत केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचे फोटो

- हे फोटो प्रकाशित करतांनाही त्यांची परवानगी घ्यावी लागणार

- सरकारी जाहिरातीत मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या फोटोला बंदी

- जाहिरातीमधील मजकूर राजकीय फायदा किंवा सत्ताधारी पक्षांची धोरण जपणारा असल्यास निर्बंध

- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती

Follow @ibnlokmattv

First Published: May 13, 2015 01:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading