13 मे : आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानला परकीय चलन कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, कोलकाता नाईट रायडर्सच्या मालकीचे समभाग नियमबाह्य पद्धतीने विकल्याप्रकरणी 'ईडी'कडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत शाहरूखला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
आयपीएल फ्रॅन्चायजी कोलकाता नाइट रायडर्सचे शेअर सहा ते आठ पट कमी किंमतीत विकल्याचा आरोप शाहरुख खानवर आहे. याद्वारे शाहरुखने परकीय चलनात फायदा कमावल्याचाही आरोप आहे. 'ईडी'ला तपासणीदरम्यान समभाग विक्रीच्या तब्बल 100 कोटींच्या व्यवहारात परकीय चलन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी 2011मध्येबी ईडीने शाहरुखला नोटिस बजावत त्याची चौकशी केली होती.
Follow @ibnlokmattv |