S M L

लाच दिली नाही म्हणून वाहतूक पोलिसाने महिलेला फेकून मारली वीट

Sachin Salve | Updated On: May 11, 2015 05:56 PM IST

लाच दिली नाही म्हणून वाहतूक पोलिसाने महिलेला फेकून मारली वीट

11 मे : राजधानी दिल्लीमध्ये एका ट्रॅफिक हवालदाराने एका महिलेच्या अंगावर चक्क वीट भिरकावत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. दिल्लीच्या प्रतिष्ठित गोल्फ लिंक्स एरियामध्ये ही घटना घडलीये. स्कूटरवरच्या या महिलेवर हा हवालदार वीट भिरकावताना व्हिडिओत कैद झालंय. लाच दिली नाही म्हणून या हवालदाराने वीट भिरकावली असा आरोप या महिलेनं केलाय.

घडलेली हकीकत अशी की, आज (सोमवारी) सकाळी ही महिला आपल्या मुलींना शाळेत सोडायला जात होती. त्यावेळी या हवालदाराने तिला ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर पेपर्स तपासण्यासाठी थांबवलं. दोघांमध्ये वाद झाला आणि या हवालदाराने वीट हातात घेतली. या महिलेला सिग्नल तोडण्यापासून थांबवल्याचं या हवालदाराचं म्हणणं आहे. तर या हवालदाराने आपल्याकडे लाच मागितली पण आपण नकार दिल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. या ट्रॅफिक हवालदाराला ताबडतोब बडतर्फ करण्यात आलंय आणि त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. झालेल्या घटनेबद्दल दिल्ली पोलिसांनी खेदही व्यक्त केलाय.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2015 04:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close