राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात राहणार हजर

  • Share this:

etv_rahul_gandhi_interview08 मे : भिंवडी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज (शुक्रवारी) भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. न्यायालयाचा आदर राखण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची माहिती गांधी यांच्या ऑफिशीयल ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारात भिवंडी इथल्या सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनकसानीचा दावा करण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांना न्यायालयाने एकदा मुभा दिली होती. मात्र, दुसर्‍यांदा मुभा देण्यास नकार देत न्यायालयाने राहुल गांधी यांना 8 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने काल (गुरूवारी) झालेल्या सुनावणीत भिवंडी न्यायालयाच्या नोटिसीला स्थगिती देत राहुल गांधींना दिलासा दिला होता. पण, न्यायालयाचा आदर राखण्यासाठी आज सकाळी अचानकपणे राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2015 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...