राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

  • Share this:

rahul-gandhi-arrives-to-address-a-rally-at-shahid-minar-ground-131

07 मे : भिंवडी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा दिला. त्यामुळे राहुल यांना उद्या भिवंडी न्यायालयात हजर रहावं लागणार नाही.

लोकसभा निवडणूक प्रचारात भिवंडी इथल्या सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनकसानीचा दावा करण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांना न्यायालयाने एकदा मुभा दिली होती. मात्र, दुसर्‍यांदा मुभा देण्यास नकार देत न्यायालयाने राहुल गांधी यांना 8 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याविषयी नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयाच्या नोटिसीला स्थगिती दिली. त्यामुळे राहुल गांधींना उद्या न्यायालयात हजर रहावं लागणार नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2015 11:49 AM IST

ताज्या बातम्या