भारताच्या मीडिया कव्हरेजवर नेपाळची जनता नाराज

भारताच्या मीडिया कव्हरेजवर नेपाळची जनता नाराज

  • Share this:

NDRF

04 मे : भूकंपग्रस्त नेपाळमध्ये मदतकार्यासाठी आलेल्या भारतासह परदेशातल्या पथकांनी माघारी जावं, अशी इच्छा नेपाळ सरकारनं व्यक्त केली आहे. बचावकार्य आता जवळपास पूर्ण झालं आहे. उर्वरित काम आम्ही करू, त्यासाठी कुणाच्या मदतीची गरज नाही, असं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे. याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी नेपाळमधील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

नेपाळमध्ये 25 एप्रिलला झालेल्या भूकंपाच्या तीव्र दुःखातून तिथली जनता सावरण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र भूकंपाचं कव्हरेज करताना असंवेदनशीलतेचा कळस गाठला, असा संताप नेपाळी जनतेने ट्विटरवर व्यक्त केला. काल दिवसभर #GoHomeIndianMedia हे ट्रेंडिंग ट्विटरवर होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल म्हणजेच एनडीआरएफने जे काम केलं त्याची भारतात जाहिरातबाजी करण्यात आली. एवढं मोठं संकट कोसळलं असताना त्याची अशी प्रसिद्धी करावी, हे नेपाळच्या जनतेला आवडलेलं नाही, असं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे.

नेपाळमध्ये भूकंपामध्ये आत्तापर्यंत 7 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्याही 14 हजारांच्यावर पोहोचली आहे. नेपाळमध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी भारतासह चीन, युके, नेदरलँड, जपान, तुर्किस्तान अशा 34 देशांचे पथक तिथे दाखल झाले होते. भारताचं सैन्य, हवाई दलाच्या जवानांसोबत एनडीआरएफच्या 50 जवानांच्या 16 तुकड्या तिथे मदतकार्य करत आहेत. पण आता मतदकार्य जवळपास पूर्ण झालं आहे. तेव्हा या सर्व देशांच्या पथकांनी परत जावं, असं नेपाळ सरकारने म्हटले आहे.

या महितीला दुजोरा देताना नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने सावध भूमिका घेतली. आता ढिगार्‍याखालून जीवंत बाहेर पडणार्‍यांची शक्यता कमी असून बचावकार्याऐवजी मदतकार्यावर भर दिले जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

एनडीआरएफचं स्पष्टीकरण :

नेपाळमधल्या सर्वच देशांच्या बचाव पथकांना परत जाण्यास सांगण्यात आलंय, त्यात भारतही आहे. बचाव कार्य करताना आम्ही नेपाळ सरकारच्या संपर्कात आहोत. भारताचं वैद्यकीय पथक अजूनही काठमांडूत बचाव कार्य करत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: May 4, 2015, 8:49 PM IST

ताज्या बातम्या