S M L

अल कायदाच्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख

Samruddha Bhambure | Updated On: May 4, 2015 12:26 PM IST

अल कायदाच्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख

04 मे : अल कायदा या अतिरेकी संघटनेच्या व्हिडीओमध्ये एक नवा व्हिडीओ जारी केला असून त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोदींच्या भाषणातून मुसलमानांच्या विरोधात युद्ध पुकारले जात असल्याचे वाक्य या व्हिडीओमध्ये आहे.

'फ्रॉम फ्रान्स टू बांग्लादेश: दि डस्ट विल नेव्हर सेटल डाऊन' असे नाव असलेला हा व्हिडीओ अल कायदाचा भारतीय उपखंडाचा प्रमुख असिम उमर याने 2 मे रोजी प्रसिद्ध केला आहे.


'जागतिक बँक व आतंरराष्ट्रीय नाणेनिधीची धोरणे, ड्रोन हल्ले, चार्ली हेब्दोतील लिखाण, संयुक्त राष्ट्संघ आणि नरेंद्र मोदी यांची वक्तव्ये या सर्वांद्वारे मुस्लिमांविरुद्ध युद्ध सुरू करण्यात आले आहे', असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. संपूर्ण जगात मुस्लिमांच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारण्यात आलं असून, फ्रान्सपासून बांगलादेशपर्यंत घडलेल्या घटनांवरून हे स्पष्ट होते.

जगभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातूनही मुस्लिमांविरोधात युद्ध पुकारण्यात येत असल्याचं उमर याने या व्हिडीओत म्हटलं आहे. तसंच, बांगलादेशातील विचारवंतांच्या हत्या आम्हीच घडवून आणल्याचीही कबूली उमर याने दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या व्हिडीओची तपासणी करण्यात येत आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2015 12:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close