S M L

काश्मीरबद्दल पाकने ढवळाढवळ करू नये, भाजपने सुनावले

Sachin Salve | Updated On: May 1, 2015 05:42 PM IST

काश्मीरबद्दल पाकने ढवळाढवळ करू नये, भाजपने सुनावले

01 मे : काश्मिरी पंडितांच्या पुन्हा काश्मीरमध्ये परतण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्ताननं केलेल्या टीकेला भाजपनं सडेतोड उत्तर दिलंय.  काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असून त्यात पाकिस्तानने ढवळाढवळ करू नये असा स्पष्ट इशारा भाजपनं दिलाय.

काश्मिरी पंडितांसाठी वेगळी वसाहत निर्माण करण्याचा विचार हा जम्मू-काश्मीरमधल्या मुसलमान समाजातल्या स्थानिकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न असल्याची टीका पाकिस्ताननं केली होती. यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटलींनी काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन ही सरकारची जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलंय. काश्मीरचा प्रदेश वादग्रस्त असल्यानं इथला कोणताही निर्णय हा जनमताच्या आधारावर व्हावा, असंही पाकिस्ताननं म्हटलंय. पण काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असून त्यात पाकिस्तानने ढवळाढवळ करू नये असा स्पष्ट इशारा भाजपनं दिलाय. पाकिस्तानला यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नाही, असंही भाजपनं स्पष्ट केलंय. काश्मिरी फुटीरतावादी या विषयावर गेले अनेक आठवडे आंदोलन करत आहेत.

पाकिस्तानचं काय म्हणणंय ?


"जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसाठी वेगळी वसाहत निर्माण करणं किंवा तसा प्रयत्न करणं हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद ठरावाचं उल्लंघन आहे. कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये बदल होऊ शकत नाही."

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2015 05:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close