भारताची नेपाळला मदत, 10 NDRF टीम रवाना

भारताची नेपाळला मदत, 10 NDRF टीम रवाना

  • Share this:

ndrf team25 एप्रिल : नेपाळमधल्या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक तातडीची बैठक घेतली. आणि नेपाळला सर्व ती मदत पुरवण्याचे आदेश दिले आहे. एनडीआरएफच्या 10 टीम्स काठमांडूला पाठवण्यात आल्यात. वैद्यकीय मदतही भारताकडून पुरवण्यात आलीय. पंतप्रधानांनी नेपाळचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा केली. आणि त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. भारत नेपाळला शक्य ती सर्व मदत करणार आहेत.

भारताकडून नेपाळला मदत

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळी पंतप्रधानांशी केली चर्चा

- भारत शक्य ती सगळी मदत करणार

- एनडीआरएफ टीमचे 40 सदस्य मदत साहित्यासह C-17 विमानात तयार

- घटनास्थळाचा तपशीलवार आढावा विमानातून घेतला जाणार

- उद्यापर्यंत 5 हेलिकॉप्टर पोखरामध्ये तैनात करण्याचा प्रयत्न

- हेलिकॉप्टरच्या माध्यमातून स्थानिकांची सुटका आणि अन्नपुरवठा करणार

- अडकलेल्यांसाठी हेल्पलाईनची सोय करण्यात आली आहे

- काठमांडूमधल्या भारतीय दूतावासाची हेल्पलाईन

977 9851107021

977 9851135141

- आज आणखी एनडीआरएफ टीम्स नेपाळमध्ये पोहोचणार

- दोन विमानांच्या माध्यमातून टीम्स नेपाळमध्ये

Follow @ibnlokmattv

First published: April 25, 2015, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading