शेतकर्‍याच्या आत्महत्येवर केजरीवालांचा माफीनामा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2015 09:44 PM IST

शेतकर्‍याच्या आत्महत्येवर केजरीवालांचा माफीनामा

kejriwal on gajendra singh_24 एप्रिल : दिल्लीत आम आदमी पक्षाच्या रॅलीत गजेंद्र सिंग या शेतकर्‍यानं आत्महत्या केली होती. या आत्महत्येबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर मौन सोडलंय. गजेंद्र सिंग यांच्या आत्महत्येबद्दल केजरीवाल यांनी माफी मागितलीये. तर दुसरीकडे केजरीवालच दोषी आहेत म्हणूनच त्यांनी माफी मागितली, असा आरोप गजेंद्र सिंग यांच्या वडिलांनी केला.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जंतरमंतर इथं आपने किसान रॅलीचं आयोजन केलं होतं. रॅली सुरू असताना राजस्थान येथील रहिवाशी असलेले गजेंद्र सिंग यांनी झाडावर चढून गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर रॅली सुरूच होती. सिंग यांनी आत्महत्येपूर्वी आपण कर्जबाजारी आहोत आणि पिकांचं नुकसान झालंय म्हणून आत्महत्या करतोय असं लिहलं होतं. गजेंद्र सिंग यांच्या आत्महत्येवरून काँग्रेस आणि भाजपने 'आप'ला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं. गजेंद्र सिंग यांच्या आत्महत्येला 'आप'लाच जबाबदार धरण्यात येत आहे. अखेर आज दोन दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितलीये. मीडियाने मला दोषी ठरवलंय. त्यामुळे मी स्वता:ला दोषी मानतो. पण, मीडियाने आता हे प्रकरण थांबावं आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा करावी असंही केजरीवाल म्हणाले. तर गजेंद्र सिंग यांच्या वडिलांनी केजरीवाल यांना दोषी ठरवलंय. जर चुकी केली नाहीतर माफी कशाला मागताय असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2015 04:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...