22 एप्रिल : बालगुन्हेगारी कायद्यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीये. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये 16 ते 18 या वयोगटातल्या गुन्हेगारांवर सज्ञान व्यक्तींसाठी असलेल्या कायद्यांअंतर्गत खटला चालवण्यास परवानगी मिळणार आहे.
दिल्लीत डिसेंबर 2012 मध्ये निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात एक गुन्हेगार 18 वर्ष वयाच्या आतला होता. त्यामुळे त्याच्यावर बालगुन्हेगारी कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात आला होता आणि त्यामुळे त्याला शिक्षाही कमी झाली होती. त्यानंतर या कायद्याच्या तरतुदीचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात येऊ लागली. मुंबईतल्या शक्तीमिल फोटोग्राफर गँगरेप प्रकरणातही एक गुन्हेगार 18 वर्षांपेक्षा लहान आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. भारतामध्ये 1992 पूर्वी 16 वर्षांपेक्षा खालचा गुन्हेगार बालगुन्हेगार मानला जातो. मात्र, 1992मध्ये भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या करारावर सही केली, आणि त्यानंतर भारतात बालगुन्हेगारांचं वय 18 वर्षं करण्यात आलं. आता त्यामध्ये पुन्हा एकदा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा