22 एप्रिल : अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या एका बळीराजाने दिल्लीमध्ये जंतरमंतरवर आम आदमी पक्षाच्या शेतकर्यांच्या रॅलीमध्ये आत्महत्या केलीय. गजेंद्र सिंह असं त्या शेतकर्याचं नाव आहे. पण, ज्या कामाचा वसा त्याने घेतला, ज्या कामामुळे त्याला ओळख मिळाली त्याची जान त्याने मृत्यूसमयीही विसरली नाही.
सिंह यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं. वडिलांनीही घरातून बाहेर काढलं. माझ्याकडे घरी जाण्याचा मार्ग नाही, मला मार्ग सांगा असं लिहून त्यांनी जिवन यात्रा संपली. पण, आपल्या अखेरच्या संदेशात त्याने 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. सिंह यांचा शेवटचा संदेश मन हेलावून टाकणार आहे. सिंह यांच्या आत्महत्येमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय लिहिलंय चिठ्ठीत ?
"मित्रांनो, मी शेतकर्याचा मुलगा आहे. माझं नाव गजेंद्र सिंह आहे आणि मला तीन मुलं आहेत. माझ्या वडिलांनी मला घरातून बाहेर काढलं. कारण माझं पीक नष्ट झालं. माझ्याकडे आता कोणतंही काम नाहीये. मला घरी जायचा मार्ग सांगा. जय जवान, जय किसान, जय राजस्थान."
Follow @ibnlokmattv |