पोरबंदरजवळ पाकिस्तानी बोट ताब्यात, 600 कोटींचं हेरॉईन जप्त

पोरबंदरजवळ पाकिस्तानी बोट ताब्यात, 600 कोटींचं हेरॉईन जप्त

  • Share this:

pakistan boat

22 एप्रिल : गुजरातच्या पोरबंदरमध्ये भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या एक संशयीत बोटींना ताब्यात घेण्यात आले आहे. या बोटींवर तब्बल 232 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत जवळपास 600 कोटींच्या घरात आहे. तसंच बोटीवरील 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सॅटलाईट्स फोन देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

पोरबंदर समुद्रकिनारपट्टीवरून पाकिस्तानी बोट भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर ही शोध मोहित राबवण्यात आली होती. या बोटीच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं संयुक्तपणे ही मोहीम राबवली.

गेल्याच आठवड्यात केंद्रीय गुप्तचर विभागाने दहशतवादी हल्ल्याच्या शक्यता असल्याचा इशारा दिला होता. यानुसार भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस यांनी गुजरात सहमुंबईत अलर्ट जारी केला होता.

Follow @ibnlokmattv

First published: April 22, 2015, 11:48 AM IST

ताज्या बातम्या