बाबा रामदेव यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा नाकारला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2015 12:11 PM IST

Image baba_ramdev_on_ajit_pawar_300x255.jpg21 एप्रिल : 'मी साधू आहे. त्यामुळे मी कुठलंही पद स्वीकारणार नाही', असं स्पष्ट करत योगगुरू बाबा रामदेव यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा नाकारलाय.

योगगुरू बाबा रामदेव यांना आज हरियाणा सरकारकडून कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार होता. त्यासाठी राज्य सरकारनं मोठा सोहळासुद्धा आयोजित केला. पण, अशी सर्व तयारी झाल्यानंतर बाबा रामदेव यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा नाकारला. बाबा रामदेव यांना पद्मश्री सुद्धा जाहीर झाला होता.

पण, हेच कारण देत त्यांनी तो पुरस्कारही नाकारला होता. हरियाणा सरकार बाबा रामदेव यांना मंत्रिपदाचा दर्जा देणार असल्याचं आधीच कळवण्यात आलं होतं. हा दर्जा आज बहाल करण्यात येणार होता. त्यासाठी एक भव्य कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी मोठा खर्चही झाला आणि त्यानंतर बाबा रामदेव यांनी मंत्रिपद नाकारलंय. विशेष म्हणजे बाबा रामदेव यांनी योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करणारे हरियाणा सरकारचे ब्रँड अँम्बेसेडर होते.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2015 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...