जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरवाद्यांचा बंदला हिंसक वळण

जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरवाद्यांचा बंदला हिंसक वळण

  • Share this:

kashmirband218 एप्रिल : मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पुकारलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय. फुटिरवाद्यांनी अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकांवर दगडफेक केलीय. एवढंच नाहीतर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगाही जाळलाय.

फुटीरवादी चळवळीचा नेता मसरत आलम याने गिलानी यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानाचा झेंडा फडकावला होता. या प्रकरणी मसरतला अटक करण्यात आलीय. मसरतला अटक करण्यात आल्यामुळे हुर्रियत कॉन्फरन्सने जम्मू काश्मीरमध्ये बंद पुकारलाय. या बंदला आज हिंसक वळण लागलं.

संतप्त जमावाने जवानांवर दगडफेक केली. सुरक्षा जवानांनी या दंगेखोरांना चोख प्रत्युत्तर दिलंय. या हिंसाचारामुळे काश्मीर खोर्‍यात पुन्हा अंशांतता निर्माण झालीये. तर तिकडे पाकिस्तानमध्यहीे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदनं आलमला पाठिंबा देण्यासाठी रॅली आयोजित केली होती.

दोन दिवसांपूर्वी हुर्रियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे फडकावल्यानंतर हा सगळा हिंसाचार उफाळलाय. दरम्यान,मसरत आलमला स्थानिक कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2015 05:01 PM IST

ताज्या बातम्या